साताऱ्यात रंगणार गुरुवारपासून
तीन दिवस तमाशा महोत्सव
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजन
सातारा : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री. विकास खारगे, मा. मुख्यमंत्री, यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तमाशा महोत्सव सातारा येथील श्री शाहू कलामंदिर येथे दि. ७ ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आला आहे.
तमाशा ही महाराष्ट्रातील एक पारंपारिक कला असून या कलेतून वगनाटयाद्वारे संगीतमय सादरीकरण होत असते. तमाशा ही जनमानसाचे मनोरंजनातून प्रबोधन करणारी कला आहे. या कलेचे जतन व संर्वधन होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी छाया खिल्लारे बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळं, बारामती यांचे सादरीकरण होईल, तर दि. 8 फेब्रुवारी 2025ला मंगला बनसोडेसह नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळं करवडी, सातारा या तमाशा मंडळाचे सादरीकरण होईल, तर दि. 9 फेब्रुवारी 2025 शालिग्राम व शांताराम रोहिणीकर तमाशा मंडळ ता. शिरपूर जिल्हा धुळे या खांदेशातील तमाशा मंडळाचे सादरीकरण होईल. दि. 10 फेब्रुवारी 2025 रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळं, संगमनेर या मंडळाचे सादरीकरण होईल. दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी वसंतराव वाडेकर लोकनाट्य तमाशा मंडळ, कराड यांच्या सादरीकरणाने महोत्सवाचा समरोप होईल. हा महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य असून सातारा येथे होऊ घातलेल्या या लोकनाट्य तमाशा महोत्सवात सहभागी कलाकाराचा किंबहुना या कलापथकाचा, वगनाट्य, नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री. विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!