भविष्यातही पोलीस दलाकडून उल्लेखनीय कामगिरीचा आलेख चढता राहील : पोलीस अधीक्षक समीर शेख


भविष्यातही पोलीस दलाकडून

उल्लेखनीय कामगिरीचा आलेख

चढता राहील :एस.पी.समीर शेख


सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने पटकावला राज्यात द्वितीय क्रमांक..!


सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी बजावलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे सातारा जिल्हा पोलीस दलास हे उत्तुंग यश मिळाले आहे. भविष्यातही सातारा जिल्हा पोलीस दलाकडून उल्लेखनीय कामगिरीचा आलेख चढता राहील, असे पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांनी त्यांचे मत व्यक्त केले.


महाराष्ट्र राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, आयुक्त, संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे, कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रीम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI), नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या अंतिरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व ३५ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामधून सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.


या उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कुशल नेतृत्वाखाली व योग्य मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते  पोलीस अधीक्षक  समीर शेख यांना अभिनंदन पत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.


सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी बजावलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे सातारा जिल्हा पोलीस दलास हे उत्तुंग यश मिळाले आहे. भविष्यात ही सातारा जिल्हा पोलीस दलाकडून उल्लेखनीय कामगिरीचा आलेख चढता राहील, असे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलीस दलाने केलेल्या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल सह्याद्रि अतिथीगृह येथे उपस्थित सर्व मान्यवरांनी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments