नवविधा भक्ती सेवा समितीतर्फे
रेल्वे प्रवासी भजनी मंडळांसाठी
रविवारी भजन स्पर्धा
मुंबई : नवविधा भक्ती सेवा समिती हार्बर रेल्वे प्रवासी भजनी मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी सानपाडा येथे हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या ३ रेल्वे मार्गावर रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या भजनी मंडळांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या भव्यदिव्य स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.
ही स्पर्धा रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत गायत्री चेतना केंद्र, सानपाडा (पूर्व), नवी मुंबई येथे होणार आहेत. या स्पर्धांमध्ये तिन्ही (३) रेल्वे मार्गावरील सुमधुर भजनी मंडळे सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत तावरे महाराज अध्यक्ष संत ज्ञानेश्वर माऊली भ. सा. संस्था, विठ्ठल मोरे (जिल्हाप्रमुख, नवी मुंबई), मनुभाई पटेल ट्रस्टी - गायत्री चेतना केंद्र, प्रकाश पाटील (उपजिल्हाप्रमुख, नवी मुंबई), अनिल साळुंखे, सुनिल साळुंखे (प्रो. प्रा. अनु साऊंड सर्विस - कोपरखैरणे), सोमनाथ चासकर (माजी नगरसेवक - महानगरप्रमुख), शंकर दादा मोहिते (समाजसेवक), सुनिल गव्हाणे (उप शहरप्रमुख) उपस्थित राहणार आहेत.
या भजन स्पर्धा कार्यक्रमाचा सानपाड्यामधील रहिवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सोमनाथ चासकर (माजी नगरसेवक / महानगर प्रमुख) व अजय पवार (विभागप्रमुख सानपाडा / समिती सल्लागार) यांनी केले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!