फलटण विधानसभा मध्यवर्ती
निवडणूक केंद्र कार्यालयास
नुह पी. बावा यांची भेट
फलटण : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघ या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक निर्णय अधिकारी 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघ मध्यवर्ती कार्यालयास भारत निवडणूक आयोग निरीक्षक नुह पी. बावा (IAS) यांनी भेट देऊन आचारसंहिता, 85+ मतदार कक्ष , टपाली मतपत्रिका कक्ष, निवडणूक खर्च कक्ष, मनुष्यबळ कक्ष चिन्हांकित मतदार यादी कक्ष, FST, SST कक्ष, प्रचार व प्रसिद्धी मीडिया कक्ष अशा विविध पथक कक्षाला भेट देऊन नोडल अधिकारी व पथकप्रमुख यांच्याशी चर्चा व कामकाजाबाबत माहिती विचारण्यात आली. यावेळी sveep पथक यांना मतदान जनजागृतीमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रम याची त्यांनी माहिती घेतली, तसेच मतदान जनजागृतीमध्ये स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात सर्व पथकांचे उत्कृष्ट नियोजन केले असल्याचे निरीक्षक नुह पी. बावा सांगितले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले यांच्या नेतृत्वाखाली नोडल अधिकारी स्वीप कृषि सेवारत्न सचिन जाधव व सर्व टीम निवडणूक कामकाज यशस्वी पार पाडण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!