केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची भाजपा सातारा जिल्हा कार्यालयास भेट

 


केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची भाजपा सातारा जिल्हा कार्यालयास भेट 


सातारा : भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक एका कार्यक्रमासाठी सातारा येथे आले असताना, त्यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यालयास भेट दिली. श्रीपाद नाईक उत्तर गोवा या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले असून,  त्यांच्याकडे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन तसेच नवनिर्माण ऊर्जा राज्यमंत्री हा पदभार आहे 


भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी सातारा जिल्ह्यातील महायुतीच्यासंदर्भात चर्चा केली आणि शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सागर शिवदास, सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, आप्पा कोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, जिल्हाचिटणीस कल्पना जाधव, जिल्हा संवादक आणि सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, सातारा शहर सरचिटणीस नितीन कदम, सातारा शहर चिटणीस विजय नाईक, सांस्कृतिक कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष युवराज मोरकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोहित सावंत, शैलेश संकपाळ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, प्रशांत जाधव, जिल्हा सचिव हरिश नातू, सोशल मीडिया जिल्हा संयोजक प्रथमेश इनामदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments