कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान

 


कृषी सहाय्यक सचिन जाधव

यांचा विठ्ठलराव विखे -पाटील

कृषी सेवारत्न पुरस्काराने गौरव

हाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईत सन्मान

फलटण : कृषी सहाय्यक श्री. सचिन जाधव यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विठ्ठलराव विखे -पाटील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

वरळी मुंबई येथे नॅशनल स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंढे, प्रधान सचिव जयश्री भोज, आयुक्त कृषी रवींद्र बनवडे, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, संचालक विनयकुमार आवटे, विकास पाटील, सुनील बोरकर, सहसंचालक अंकुश माने आदी मान्यवर उपस्थित होते.

फलटण तालुक्यातील सासकलचे कृषी सहाय्यक सचिन जाधव यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला पहिल्यांदाच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे -पाटील पुरस्कार मिळवण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून कृषि विभागाकडून दिला जाणारा पुरस्कार आहे. 

कृषी सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल उमेश पाटील विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, भाग्यश्री फरांदे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सातारा, सुहास रनसिंग उपविभागीय कृषि अधिकारी फलटण, दत्तात्रय गायकवाड तालुका कृषि अधिकारी फलटण, शहाजी शिंदे मंडळ कृषि अधिकारी विडणी, अजित सोनवलकर कृषि पर्यवेक्षक तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी सहाय्यक संघटना व मान्यवरांनी सचिन जाधव यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments