साऊथ आशियाई ज्युनियर
चॅम्पियन स्पर्धेत
प्राची देवकरला गोल्ड मेडल
सातारा : सातारा जिल्ह्यातील किरपे (ता. कराड) गावची कन्या प्राची अकुंश देवकर हिने साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत ३ हजार मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले.चेन्नई येथील स्पर्धेत अवघ्या ९ मिनिट ५७.२० सेकंद वेळेत प्राचीने हे गोल्ड मिळवले. प्राचीच्या कामगिरीमुळे किरपे गावासह क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. लेकीच्या यशामुळे आई - वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
किरपे या खेडेगावातील शेतकर्याची मुलगी असलेली प्राची अंकुश देवकर हिने मध्यप्रदेशमध्ये झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. गुवाहटीत झालेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत प्राचीने ४ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदाकाला गवसणी घातली आहे.
प्राचीचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. आई- वडिलांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तिने आतापर्यंत ७० हून अधिक ट्रॉफी तसेच मेडल्स मिळवली आहेत.
तिचे प्राथमिक शिक्षण किरपे गावात झाले आहे. ती चौथीत असताना शालेय स्पर्धेत तिच्यातील क्रीडा गुण अंकुश नांगरे या शिक्षकांनी हेरले. तिच्या घरी जाऊन नांगरे यांनी आई-वडिलांना तिच्या क्रीडा नैपुण्यावर लक्ष देण्यास सांगितले. तेव्हापासून ती शालेय स्पर्धेत चमकत गेली. तांबवे गावातील स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयात तिच्यातील क्रीडा गुणांना मोठा वाव मिळाला. सध्या प्राची कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण महाविद्यालयात बी. ए. च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. सध्या ती बेंगलोर येथे प्रशिक्षण घेत आहे. कराड येथे राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक अतुल पाटील हे तिचा सराव घेतात.
आशियाई ज्युनियर स्पर्धेत प्राची देवकरने गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, प्रशिक्षक अतुल पाटील, क्रीडाप्रेमी सुनील बामणे, सलीम मुजावर, प्रकाश काटवटे, सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर, पोलीस पाटील प्रवीणकुमार तिकवडे, शंकरराव माने, अकुंश देवकर, कृष्णत माने, बजरंग कदम यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!