वाईत पूर्ववैमन्यातून गोळीबारात तरुण जखमी
एमआयडीसीतील रात्री नऊ वाजता घडली घटना; चौकशीसाठी एकजण पोलिसांच्या ताब्यात
सातारा : वाई एमआयडीसीतील चांदणी चौकात एका तरुणावर पूर्ववैमन्यातून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे, तर गोळीबार करणारे अज्ञात घटनास्थळावरून पळून गेले आहेत. या घटनेमुळे वाई शहर हादरले आहे. वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. याप्रकरणी एकाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, वाई एमआयडीसीतील चांदणी चौकात गेल्या काही महिन्यांपूर्वी युवकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारी प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यातील संशयित असलेल्या एका तरुणावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबार करणारे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर एकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोचले. पोलिसांनी तत्काळ जखमी युवकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वाई पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गोळीबार झालेल्या ठिकाणी काही धागेदोरे हाती लागतात का, तसेच गोळीबार कोणत्या कारणावरून केला याचा शोध पोलीस घेत आहेत.
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अप्पर अधीक्षक आंचल दलाल, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व टीमनेही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाई पोलिसांना या घटनेचा छडा लावण्याचे आदेश समीर शेख यांनी दिले आहेत.
गोळीबार करणारा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. याप्रकरणी चौकशीकामी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करत आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!