नियोजित कार्यक्रम जागेची
उदयनराजेंकडून पाहणी
सातारा : यंदाच्या वर्षापासून देण्यात येणार मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना घोषित झाला आहे.
सातारा शहरातील सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री शिवजयंतीदिनी प्रदान करण्यात येणार आहे. या नियोजित कार्यक्रमाच्या जागेची आज छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी व पोलिसप्रमुख श्री समीर शेख यांच्या समवेत पाहणी केली.
यावेळी सैनिक स्कूलचे प्राचार्य, अधिक्षक, नगरपरिषदेचे सीओ श्री अभिजीत बापट, विविध विभागांचे विभागप्रमुख, श्री सुनील काटकर, श्री संग्राम बर्गे, श्री पंकज चव्हाण, श्री मनोज शेंडे, श्री चंद्रकांत पाटील व मान्यवर उपस्थित होते.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!