बैलगाडामालक पंढरीशेठ फडके यांचे
हृदयविकाराने निधन
सातारा : वडिलांच्या काळापासून १९८६ पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बैलगाडाप्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरीशेठ फडके हे समीकरण ठरलेल होत.
पंढरीशेठ फडके यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास ४०-५० शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत. फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकीन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. १९८६ सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्यावेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!