कॅन्सर उपचारात सकारात्मक
दृष्टीकोन महत्वाचा : डॉ. देशमुख
केक कापून कॅन्सर रुग्णांनी केले नववर्षाचे स्वागत
डॉक्टर, रुग्णालयातील स्टाफचे मानले आभार
सातारा : कँन्सर उपचारात सकारात्मक दृष्टीकोन हा महत्वाचा भाग आहे. रुग्ण मानसिकदृष्ट्या खंबीर आणि सकारात्मक असल्यास अर्धा आजार तिथेच बरा होतो. आज कॅन्सर उपचारप्रणाली कमालीची अद्ययावत झाली आहे. नवनवीन तंत्रज्ञान, औषधे व तज्ञ डाँक्टरांच्या सहाय्याने आज कँन्सरसारख्या आजारावर मात करणे शक्य झाले आहे. असे प्रतिपादन आँन्को लाईफ कँन्सर सेंटरचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्री. उदय देशमुख यांनी केले.
आँन्को लाईफ कँन्सर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या कँन्सर रुग्णांनी नववर्षाचे स्वागत केक कापून केले. या रुग्णांना जगण्याची नवी उमेद, नवी आशा हा संदेश दिला. त्यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी आँन्को लाईफचे तज्ञ डाँक्टर, नर्सेस व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, आँन्को लाईफ हे सर्व अद्ययावत रेडीएशन, पेटसिटीसारख्या सुविधांनी ग्रामीण भागातील रुग्णांना अगदी शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार देत आहे. तसेच, ही सेवा अधिकाधिक रुग्णांना देण्यावर आमचा भर आहे.
२०२४ या नववर्षाचे सर्वत्र अतिशय दणक्यात स्वागत झाले. या नवीन वर्षात एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रत्येकजण काही तरी नवीन संकल्प व ध्येय ठेवून ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असतो. यामध्ये सदृढ आरोग्य, करियर आणि छंद जोपासण्याचे मनाशी ठरवून त्यानुसार नियोजन करतात. अशीच सुरुवात करत आज आँन्को लाईफ कँन्सर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या कँन्सर रुग्णांनी नववर्षाचे स्वागत केक कापून करत जगण्याची नवी उमेद, नवी आशा हा संदेश दिला.
पूर्वी कँन्सर या आजाराचे नाव जरी घेतले तरी पायाखालची जमीन सरकायची, पण आता उपचारप्रणाली खूपच अद्ययावत झाली आहे. यामध्ये झालेल्या नवनवीन संशोधनाने आज कर्करोगावर मात करणे शक्य झाले आहे. तसेच, या आजाराला सामोरे जाताना रुग्णांमध्ये एक सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक असून, तो उपचारासाठी फलदायी ठरतो. या कँन्सरवर मात करण्याच्या दृष्टीने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर असल्यास उपचारांनाही चांगला प्रतिसाद मिळतो, असे विविध वैद्यकीय अहवालात दिसून आले आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!