नामदेवराव भोसले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 


जीवन गौरव पुरस्काराने

नामदेवराव भोसले सन्मानित 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पुणे येथे गौरव

सातारा : जावळी तालुका वारकरी संघाचे संचालक, कोयना विभाग वारकरी संघाचे खजिनदार व ज्येष्ठ नागरिक संघ कोयना विभागप्रमुख नामदेव गणपत भोसले (तापोळा- तेटली) यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ इंटरनॅशनल लाॅन्जेव्हिटी सेंटर इंडिया या संस्थेच्या वतीने पद्मविभूषण शास्त्रज्ञ मा. रघुनाथ माशेलकर, माजी पोलिस महासंचालक मा. जयंत उमराणीकर, भारती विद्यापिठाचे कुलगुरू मा. प्रो. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते पुणे येथे कै. बी. जी. देशमुख जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.श्री

नामदेवराव भोसले यांनी कोयना विभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक गावात भजन मंडळे स्थापन केली आहेत. जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजनात दिलेल्या योगदानाबद्दल धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्यांना यापूर्वीच गौरविले आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भोसले यांनी टेलरींग व्यवसायाबरोबरच पोष्टाची नोकरी करून आपल्या परिवारीक समृध्दी बरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर रहावून केलेल्या कार्याचा यापूर्वीही अनेक संस्थांनी पुरस्कार देवून सन्मान केला आहे.

कै.बी.जी. देशमुख जीवन गौरव पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून ३ व्यक्तींची निवड करण्यात आली होती. त्यामधे जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून 

श्री. नामदेव भोसले यांची झालेली निवड ग्रामीण भागातील जेष्ठांची प्रेरणा वाढविणारी आहे. पुणे येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला कोयना विभाग वारकरी संघाचे अध्यक्ष ह.भ.प.बाळकृष्ण महाराज शिंदे, विलासबाबा जवळ, कोंडीराम महाराज शिंदे, आनंद जाधव, बाळकृष्ण गुरुजी सपकाळ, पांडूरंग साळुंखे गुरुजी, गणेशबुवा सपकाळ, गणेश सपकाळ सरपंच वेळापूर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments