भाजपात "कार्यकर्ता"
हे सगळ्यात वरचे पद
राष्ट्रीय चिटणीस खासदार कामाख्य प्रसाद तासा यांचे मत
सातारा : भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता हे सगळ्यात मोठे आणि कायम टिकणारे पद आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भाजपाची केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता आहे, असे मत भाजपा राष्ट्रीय चिटणीस राज्यसभा खासदार कामाख्य प्रसाद तासा यांनी व्यक्त केले.
कामाख्य प्रसाद तासा हे लोकसभेचे खासदार राहिले असून, सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीसपदाची महत्वाची जबाबदारी आहे.
सातारा तालुक्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वेणेगाव येथे विकसित भारत रथ यात्रेच्या प्रवासासाठी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाच्यावेळी खासदार कामाख्य प्रसाद तासा उपस्थित राहण्यास आले होते.
वेणेगाव येथील विकसित भारत रथ यात्रेच्या कार्यक्रमास संबोधित करताना आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते, पदाधिकारी केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत, तसेच योग्य व्यक्तीला लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत.
खासदार तासा म्हणाले, "मोदीकी गॅरंटी " म्हणजेच मोदी सरकारची हमी हा कार्यक्रम संपूर्ण भारतात सुरू आहे. आज वेणेगाव येथील शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीवरील कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले ही माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्वानी जे प्रेम दिले त्याबद्दल मी ऋणी राहील. सर्वानी लोकसेवेच्या योजनाचा लाभ घ्यावा आणि आपले जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करावा.
सातारा सर्किट हाऊस येथे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी मध्ये सर्व पदे ही तीन वर्षासाठीच असतात. परंतु कार्यकर्ता हे असे सन्मानाचे पद आहे की जे कुणीही कधी ही काढून घेऊ शकत नाही. कार्यकर्त्यांची मेहनत व अथक प्रयत्नांमुळे पक्षाची आजपर्यंतची वाटचाल झालेली आहे. मी सुद्धा एक कार्यकर्ताच आहे. कार्यकर्त्याच्या कामाला आणि श्रमाला मी वंदन करतो.
खासदार श्री. छ. उदयनसिंहराजे भोसले यांची संकल्पना व प्रयत्नातून उभारण्यात येत असलेल्या अजंठा चौक येथील नियोजित सैनिक स्मारकास खा. कामाख्य प्रसाद तासा यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सातारा लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर यांनी खा. कामाख्य प्रसाद तासा यांचे स्वागत केले.
अजिंक्यतारा साखर कारखाना परिसरातील श्री तुळजाभवानी मंदिरास भेट देऊन त्यांनी मातेचे दर्शन घेतले. अजिंक्यतारा साखर कारखान्यास भेट दिली, त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासहित संचालक मंडळ उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचे स्वागत केले. कारखाना परिसराची पाहणी करून तासा यांनी माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
या वेळी सातारा विधानसभा निवडणूकप्रमुख अविनाश कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण पश्चिम अध्यक्ष महेश गाडे, जावळी अध्यक्ष श्रीहरी गोळे, रहिमतपूर अध्यक्ष भीमरावकाका पाटील, कराड उत्तरचे शंकरराव शेजवळ, कराड दक्षिणचे पै. धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रणजित फाळके, गणेश घोरपडे, राहुल शिवनामे, सुहास राजेशिर्के, धनंजय पाटील, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. सचिन भोसले, मनिष महाडवाले, उद्योग आघाडीचे अमोल सणस, सायली मुतालिक, ॲड. विक्रम पवार, संग्राम घोरपडे, पंचायत राज जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, हेमांगी जोशी, चित्रा माने, कीर्ती पोळ, निशा जाधव, अनिता बोडस, वनिता पवार, क्रीडा आघाडी जिल्हाध्यक्ष हेमंत शिंदे, चित्रपट आघाडीचे विकास बनकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भरत जंत्रे, अनु. जाती अध्यक्ष अमित भिसे, जेष्ठ कार्यकर्ता रवी आपटे, प्रशांत जोशी, अक्षय भोसले, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!