विनायक रांजणे यांचे
वृद्धापकाळाने निधन
सातारा : वहागाव (ता. जावळी) येथील ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक श्री. विनायक शंकर रांजणे (बापू) (वय ७७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुली, सुना, नातवंडे, पुतणे, भाऊ व भावजयी असा त्यांचा परिवार आहे.
प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर ते मुंबईला १९६५ मध्ये नोकरीनिमित्ताने गेले. मुंबईमध्ये काहीकाळ त्यांनी छोटी-मोठी नोकरी केली. नोकरी करत असताना मुंबईत मराठी माणूस म्हणून त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायात उडी घेतली. या व्यवसायातही त्यांनी मुंबईत चांगला जम बसवला. त्यानंतर त्यांना 'विनायक शेठ' या नावाने पंचक्रोशीमध्ये लोक ओळखू लागले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट, जिद्दी व निष्ठेने त्यांनी हा ट्रान्सपोर्ट व्यवसाय वाढवला. साधी राहणी, प्रेमळ स्वभावामुळे ते गावात सर्वांचे प्रिय होते. उद्योजक अशोक रांजणे व प्रदीप रांजणे यांचे ते वडील होत.
विनायक रांजणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुली, सुना, नातवंडे, पुतणे, भाऊ व भावजयी असा त्यांचा परिवार आहे.
गुरुवार, दि. १४ रोजी सकाळी नऊ वाजता वहागाव येथे सावडणे विधी होणार आहे.
Editing by Santosh Shirale

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!