साताऱ्यात अभिमंत्रीत अक्षतांच्या ४० कलशांची शोभायात्रा

 


साताऱ्यात अभिमंत्रित

अक्षतांच्या ४० कलशांची 

भव्य शोभायात्रा

श्री क्षेत्र अयोध्या येथील मंदिरात २२ जानेवारीला श्रीरामलल्लांच्या शिल्पांची प्राणप्रतिष्ठा

हजारो सातारकर सहभागी, शोभायात्रा मार्गावर रांगोळ्या, रथावर पुष्पवृष्टी

सातारा : श्री क्षेत्र अयोध्या येथे निर्माण झालेल्या भव्य मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामलल्लांच्या शिल्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यासाठी तेथून अभिमंत्रीत करून आलेल्या अक्षतांच्या ४० कलशांची भव्य शोभायात्रा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. या शोभायात्रेत हजारो सातारकर सहभागी झाले होते.

श्रीराम मंदिर न्यास अयोध्या व विश्व हिंदू परिषदेने हा कार्यक्रम संत महंत, हिंदू संघटना व सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी दहाच्या सुमारास अक्षता असलेल्या रथाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी रथाचा शुभारंभ आर्ट ऑफ लिव्हिंगचे ब्रह्मचारी ज्ञानेश्वर मते, ह. भ. ब. सापते महाराज, रामदास स्वामी संस्थानचे भूषण स्वामी, आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, बाबुजी नाटेकर, मुकुंदराव आफळे, डॉ. सुभाष दर्भे, डॉ. अभयराव देशपांडे, संदीप आठले, महेश शिवदे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, प्रवीण शहाणे, विजयराव फडके, विजय गाडवे, रवी ताथवडेकर, अमित कुलकर्णी, सचिन वाळवेकर, अजित देशपांडे, रामभाऊ नरळे, अतुल शालगर, दत्ताजी थोरात, अप्पा कोरे, चित्रलेखा माने कदम, प्रिया शिंदे, विजय भिलारे, नगरसेवक भाऊ जांभळे, विजय काटवटे, अमोल मोहिते तसेच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक विहिंप, बजरंग दलाचे कार्यकर्ते व सातारकर उपस्थित होते. 


न्यू इंग्लिश स्कूल मैदानावरून सुरू झालेली शोभायात्रा जांभळी (मारवाडी चौक) -राजपथावरून (वरच्या रस्त्याने) मोती चौक खालच्या रस्त्याने पंचमुखी मंदिर - सम्राट चौक - जुना मोटर स्टॅन्ड चौक ५०१ पाटी चौक शेटे चौक श्री दंग्या मारुती चौक - कमानी हौद चौक - राजपथावरून देवी चौक जांभळी (मारवाडी चौक) व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये परत आली.

या भव्य शोभायात्रेस सातारा जिल्ह्यातील सर्व मान्यवर, लोकप्रतिनिधी व आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी सहभागी झाले होते.मिरवणूक मार्गावर मारवाडी व्यापारी मंडळाच्या वतीने राम मंदिराची कलाकृती ठेवण्यात आली होती. तसेच पाणीवाटपही करण्यात आले. तर दुर्गामाता मंदिर व्यवस्थापनातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. यात्रा मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे थंड पाणी व सरवताचे स्टॉल लावले होते. 

शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. शोभायात्रेच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच प्रमुख चौकात पूजन करण्यात आले. शोभायात्रेच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.मिरवणुकीनंतर गणेश सभागृहात कलश वितरण कार्यक्रम झाला. 

यावेळी मुकुंदराव आफळे, बाबुजी नाटेकर यांनी मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वरजी यांनी आर्शीवचन दिले. सूत्रसंचालन संपदा देशपांडे, आभार विजय गाढवे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments