भाजपाची विधानसभा प्रभारी, सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 भाजपाची विधानसभा प्रभारी, सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर 

जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची माहिती 



सातारा : भारतीय जनता पार्टीची विधानसभा प्रभारी, सातारा जिल्हा कार्यकारिणी, मंडल अध्यक्ष व आघाडी मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षांची यादी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी जाहीर केली.

ही यादी जाहीर करताना त्यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार मदन भोसले, प्रदेश सचिव भरत पाटील, लोकसभा प्रभारी अतुल भोसले, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, कोरेगावच्या नेत्या सौ.प्रियाताई शिंदे, लोकसभा संयोजक सुनील काटकर, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्याशी चर्चा केली. तसेच भौगोलिक, राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून कार्यकारणी तयार केली आहे. 

भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे आणि विचार सातारा जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही कार्यकारिणी काम करेल. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्यासाठी व जिंकण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करेल. असा मला विश्वास आहे.

कार्यकारिणीतील प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्यांच्या संघटनात्मक जबाबदारी व्यतिरिक्त, सातारा जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने बुथ पातळीवरील जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रदेशाकडून आलेली कामे वेळच्यावेळी पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे महाविजय २०२४ चे ध्येय साकार करण्यासाठी ही कार्यकारिणी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करेल आणि संपूर्ण जिल्ह्यात कमळ फुलवले जाईल, असा व्यक्त केला विश्वास कदम व्यक्त केला आहे.





Post a Comment

0 Comments