साताऱ्यात बोगदा परिसरात
मध्यरात्री रक्तरंजित थरार
कौटुंबिक वादातून ३५ वर्षीय महिलेचा खून
पत्नीवर प्राणघातक हल्ल्याचा पतीवर संशय
शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात
सातारा | प्रतिनिधी
सातारा शहरानजीकच्या सातारा बोगदा परिसरात रविवारी मध्यरात्री कौटुंबिक वादातून ३५ वर्षीय महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री सुमारे अडीचच्या सुमारास चव्हाण दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी पती प्रदीप हणमंत चव्हाण याने पत्नी सुनिता यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनिता यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित पती प्रदीप चव्हाण याला काही तासांतच ताब्यात घेतले.
दरम्यान, या घटनेमागे नेमका कोणता कौटुंबिक वाद होता, हल्ल्याचे स्वरूप काय होते आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत. खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांच्या तपासानंतर घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!