ओबीसीच्या आरक्षणावर
लढणाऱ्या मराठा कुणबी
उमेदवारांना ओबीसींनी
मतदान करू नये :
अध्यक्ष भरत लोकरे
म्हसवे गटाचे अपक्ष उमेदवार संतोष शिराळे यांच्या प्रचारार्थ गाव भेटी
सातारा : जावली तालुका येथील ३६ म्हसवे गटाचे अपक्ष उमेदवार श्री. संतोष दिनकर शिराळे यांच्या प्रचारार्थ करंदी, करंजोशी, नेवेकरवाडी, रानगेघर आलेवाडी, दरे, धोंडेवाडी, करहर येथे जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे, लोहार सुतार समाजाचे अध्यक्ष माधव लोहार, महाबळेश्वर ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार, लोहार-सुतार संघटनेचे कार्याध्यक्ष हनुमंत मोने, सहसचिव संतोष सपकाळ यांचा प्रचार दौरा पूर्ण झाला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यात ओबीसीच्या आरक्षणावर अतिक्रमण करून कुणबी ओबीसी मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करत आहे. त्यांना आत्ताच धडा शिकवण्याची वेळ आहे. राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक मूळ ओबीसींना डावलून मराठा कुणबीना ओबीसीच्या आरक्षणात तिकीट दिले आहे. या सगळ्या गोष्टी ओबीसी समाजाला पूर्ण माहीत झाल्या आहेत. अशा पक्षांना व अशा उमेदवारांना जिल्ह्यातील ओबीसी समाज आपली जागा दाखवून देईल व ओबीसी प्रतिनिधींना भरघोस मताने निवडून देईल, असे आवाहन जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी केले.
ओबीसी बांधवांनी ओबीसीवरचे हे संकट दूर करण्यासाठी संघटित होऊन ओबीसी बांधवांनाच मतदान करावे व निवडून आणावे, असे आवाहन महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार यांनी केले.
लोहार सुतार समाजाचे अध्यक्ष माधव लोहार यांनी सांगितले, म्हातारी मेलेल्याचे दुःख नाही पण काळ सोकवून चालणार नाही. ग्रामपंचायतसुद्धा ओबीसीच्या जागेवर मराठा कुणबी अतिक्रमण करू लागला, तर ओबीसीचे आरक्षण संपून जाणार आहे. ते टिकवण्यासाठी दलित ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आरक्षण वाचवण्यासाठी ओरिजनल ओबीसी प्रतिनिधींनाच मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणावे, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रत्येक गावातून घरोघरी प्रचार करण्यात आला.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!