सातारा जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट

 


सातारा जिल्ह्याला

मंगळवारी रेड अलर्ट

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सातारा : हवामान विभागाने सातारा जिल्ह्यामध्ये दि. ९ जुलैला मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी व स्वत: हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका. नदी-नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका. पर्यटन स्थळे उदा. धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जाणेचे टाळावे. पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नका व मोबाईलचा वापर करू नका. प्रवास करतेवेळी घाट रस्त्यावर विनाकारण थांबू नये. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

Post a Comment

0 Comments