आमदार राजा सिंग यांच्या उपस्थितीत होणार ३६४ वा किल्ले चंदन वंदन गड विजयोत्सव

 


आमदार राजा सिंग यांच्या

 उपस्थितीत होणार

३६४ किल्ले चंदन वंदन

 गड विजयोत्सव 

सातारा : किल्ले चंदन वंदन या किल्ल्यांचा ३६४ वा विजयोत्सव बुधवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता साजरा करण्यात येत आहे.




प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच परकियांच्या ताब्यातून किल्ले घेण्यास सुरुवात केली. सर्व प्रथम त्यांनी चंदन वंदन हे किल्ले ताब्यात घेतले. त्या क्षणाची आठवण म्हणून श्री. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


यंदाच्या विजयोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणा राज्यातील भाग्यनगरचे आमदार राजा सिंग व हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त युवक, महिला, युवती व नागरिकांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments