पत्रकारांशी उर्मट वर्तन प्रकरणी
महाबळेश्वर आगारातील
अधिकारी निलंबित
सातारा विभागीय नियंत्रकांकडून कारवाई
संतोष शिराळे, सातारा : महाबळेश्वर आगारातील अधिकाऱ्यांनी प्रवासी व पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेत संवाद साधल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद जिल्हाभर उमटले असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने ही कारवाई केली.
रविवारी महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर आगाराने नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर बस सोडण्याची व्यवस्था केली होती. मात्र, बसमध्ये प्रवासी भरल्यानंतरही बस वेळेत न सोडल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पुढील बस व रेल्वे गाठण्याची घाई असल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला.
यावेळी उपस्थित अधिकारी शाहरुख खान यांनी सुरुवातीला प्रवाशांशी नम्रपणे संवाद साधला. मात्र काही वेळानंतर त्यांचा बोलण्याचा सूर बदलल्याचे सांगितले जाते. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित पत्रकारांनी व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!